शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधतेसाठी दोन हजारांवर उमेदवारांचे प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:38 IST

अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रांसाठी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केले.

ठळक मुद्देउमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस!सहाव्या दिवशी हजारावर अर्ज दाखल!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रांसाठी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केले.पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करताना, अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोच पावती जोडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांची गर्दी होत आहे. गत १५ सप्टेंबरपासून जात पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांचे प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. शुक्रवार, २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समिती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३0 वाजेपर्यंत असून, या वेळेपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत.

उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस!जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन  उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस असल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हय़ातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची झुंबड होणार आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत आहे. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत (प्रिंट) तहसील कार्यालयातील संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करण्याची वेळ दुपारी ४.३0 वाजेपर्यंत आहे.

नियोजन करण्याचे निर्देश!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शुक्रवारपर्यंंत केवळ २0 टक्के उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित ८0 टक्के उमेदवारी अर्ज मुदतीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दाखल होणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारणे, पोलीस बंदोबस्त, वाहनांची पार्किंंग व्यवस्था इत्यादी दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अकोला व बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

सहाव्या दिवशी हजारावर अर्ज दाखल!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी जिल्हय़ातील सहा तालुक्यांत १ हजार ६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात सरपंच पदांसाठी- १९ व ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी- ८७, अकोट तालुक्यात सरपंच पदांसाठी- ५८ व सदस्य पदांसाठी- १९९, मूर्तिजापूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ७७ व सदस्य पदांसाठी- १७३, बाळापूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ४३ व सदस्य पदांसाठी- ७८, बाश्रीटाकळी तालुक्यात सरपंच पदांसाठी- ५६ व सदस्य पदांसाठी- १५७, पातूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ३१ व सदस्य पदांसाठी- ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अकोला तालुक्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांंची माहिती रात्री उशिरापर्यंंत प्राप्त होऊ शकली नाही.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले.-एस.आर. कदम,उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती.