शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अकोला शहरातील 'जनता कर्फ्यू ' चा प्रस्ताव मुख्यसचिवांकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:47 IST

'जनता कर्फ्यू ' चा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी राज्य शासनाच्या मुख्यसचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग करण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत अकोला शहरात ' जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी गुरुवारी घोषित केले . त्यानुषंगाने शहरातील 'जनता कर्फ्यू ' चा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी राज्य शासनाच्या मुख्यसचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला.अकोला शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित 'पॉझिटिव्ह ' रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता , शहरातील वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या पृष्ठभूमीवर २८ मे रोजी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शहरातील कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत अकोला शहरात 'जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. दरम्यान , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'लॉकडाऊन' च्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना गत १९ मे रोजी राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आल्या असून , त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनाव्यतिरिक्त कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. त्यानुषंगाने अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शहरात १ ते ६ जून असे सहा दिवस 'जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला असून , जनता कर्फ्यू पाळण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.-कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरात १ ते ६ जून सहा दिवस 'जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला असून , त्यानुसार जनता कर्फ्यू पाळण्यात मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे.-संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या