शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुख्याध्यापकासह शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:33 IST

रेकॉर्डची तपासणी केल्याने त्यामध्ये दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिकविण्याच्या परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाठ सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे, तर रेकॉर्डची तपासणी केल्याने त्यामध्ये दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला. विशेष म्हणजे, त्या शिक्षकांवरील कारवाई रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारीच प्रसिद्ध केले होते.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील १४ पैकी ११ शिक्षक शिकविण्याच्या गुणवत्तेत ‘ढ’ असल्याचे पुढे आले. सहा शिक्षकांना तर काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत.शिक्षक अध्यापन कार्यात किती सक्षम आहेत, याची पडताळणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या कार्यशाळेत करण्यात आली. त्यावेळी १४ शिक्षकांनी पाठाचे सादरीकरण केले. त्यामध्ये १० शिक्षकांना ५० पैकी २५ गुणही मिळाले नाहीत. सहा शिक्षक १७ गुणांचा टप्पा पार करू शकले नाहीत. या शिक्षकांवर कोणती कारवाई करावी, याबाबत सुरुवातीला गोंधळ होता. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाकडे कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. तेव्हापासून ही कारवाई थंड बस्त्यात होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाने मंगळवारी प्रस्ताव सादर केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित सात शिक्षकांना पाठ शिकविण्याची पुन्हा संधी देण्याचे सांगितले. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा पुनोती- अरुण गंगाराम राठोड, धोतरखेड- गोपाल लोखंडे, राजंदा- बिरसिंग डाबेराव, साईनगर- उद्धवराव देशमुख, वाकी- मोहन टेकाडे, सांगळूद- शारदा भरणे, खडका- विजय तायडे यांचा समावेश आहे. रेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार आहे. रेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मोइनोद्दीन, पिंप्री शाळेचे उमेश चोपडे, वडाळी सटवाई शाळेच्या अनिता देशमुख, कंझरा शाळेचे मेश्राम, सिरसो शाळेच्या लता मालवे, खैरखेडचे सुरेंद्र दिवनाले यांच्यापैकी कुणावर कारवाई होईल, हे लवकरच पुढे येणार आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद