शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान

By admin | Updated: August 3, 2015 01:55 IST

ग्रामपंचायत निवडणुका; मतदारांच्या गाठीभेटीवर भर.

अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी गेल्या आठवडाभरापासून गावागावांत धडाडणार्‍या निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळी ५.३0 वाजता थंडावल्या. जाहीर प्रचार संपुष्टात आल्याने, उमेदवार आणि सर्मथकांनी गुपचूप घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देणे सुरू केले असून, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असलेल्या जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. या निवडणुकांसाठी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार २४ जुलैपासून सुरू झाला होता. शहरानजीकच्या मोठय़ा ग्रामपंचायतींसह सर्वच संबंधित ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये आठडाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराला उधाण आले होते. गावपातळीवर पुढार्‍यांसह विविध राजकीय पक्षांचे सर्कल आणि गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते, पॅनलचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि उमेदवार व सर्मथक ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचारकार्यात गुंतले होते. उमेदवारांच्या प्रचारासाठी ऑटो, जीप, कार इत्यादी वाहने गावागावांत धावत होती. तसेच ऑटोवर लाऊडस्पीकर आणि बॅनर लावून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. मतदान प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास आधी म्हणजेच रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३0 ग्रामपंचायत निवडणुकांच्या धडाडणार्‍या प्रचारतोफा थंडावल्या. गावागावांत उमेदवारांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर्स उतरविण्यात आले. जाहीर प्रचारासाठी ऑटोवर लावण्यात आलेले भोंगे काढण्यात आले. तसेच प्रचारासाठी धावणारी वाहनेही थांबविण्यात आली. निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात आल्याने, उमेदवार आणि सर्मथकांनी गुपचूप गावातील वार्डांत घरोघरी फिरून, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर आता भर देणे सुरू केले आहे.