शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या जागेवर उभारता येणार ‘पोकरा’तून प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भाचा समावेश करण्यात आला ...

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भाचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाचे सर्वांगीण उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रकल्पातील सर्व योजना, घटक राबविण्यात येणार असल्याचे ठरले आहे. विदर्भातील खारपाणपट्टा क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामधून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी गट व कंपन्यांचा कल पोकराकडे दिसून येत आहे. शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना पोकरातून प्रकल्प उभारणीसाठी गट, कंपनीच्या नावावर असलेला सातबारा, आठ अ किंवा २० वर्षे भाडेतत्त्वाचा नोंदणीकृत करारनामा सादर करणे आवश्यक आहे; मात्र प्रकल्प हा २० लाखांपेक्षा कमी किमतीचा असल्यास तसेच प्रकल्पांतर्गत बांधकाम ही बाब प्रमुख नसल्यास किमान ७ वर्षांचा नोंदणीकृत भाडेतत्त्वाचा करारनामा सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या अर्जदारांना शासनाकडून किंवा ग्रामपंचायतीच्या जागेवर लेखी परवानगी घेऊन प्रकल्प उभारता येणार आहे. याबाबतचे पत्रही पोकरा प्रकल्प संचालकांनी दिले आहे. त्यामुळे लाभार्थी गट व कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रकल्प उभारण्यास होणार सोयीस्कर!

शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना छोटा प्रकल्प उभारायचे असल्यास जागेसाठी आर्थिक गुंतवणूक करावी लागत होती, हे परवडणारे नव्हते. आता ग्रामपंचायतीच्या जागेत हा प्रकल्प उभारता येणार असल्याने योजनेचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे.

सभासद संख्या १० असलेला कुटुंबाचा गट पात्र

प्रकल्पासाठी निवड झालेल्या वेगवेगळ्या कुटुंबातील किमान ११ सदस्य असणे आवश्यक होते. या घटकाचा लाभ एकाच कुटुंबावर केंद्रित गटाला दिला जाणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेद अंतर्गत नोंदणी केलेल्या गटांमध्ये विविध कुटुंबातील किमान १० सभासद संख्या गटाच्या पात्रता निकषासाठी मान्य करण्यात आली आहे.