शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक भरती, मागण्यांबाबत शासन गंभीर नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:34 IST

अकोला: उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत एमफुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनुसार प्राध्यापक भरती आणि इतर मागण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्याचे आश्वासन उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले होते.

अकोला: उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत एमफुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनुसार प्राध्यापक भरती आणि इतर मागण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्याचे आश्वासन उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले होते; परंतु अनेक दिवस उलटूनही शासनाने निर्णय घेतला नाही. शासन प्राध्यापक भरती, प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात गंभीर दिसत नसल्यामुळे महाराष्ट्र नेट-सेट, पीएच.डी. व सीएचबी कृती समितीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी दिला आहे.महाराष्ट्र नेट-सेट, पीएच.डी. व सीएचबी कृती समितीने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये उच्च शिक्षण विभागाने ८ आॅक्टोबर रोजी प्राध्यापक भरती व इतर मागण्यासंदर्भात सुधारित इतिवृत्त काढून प्रकाशित केले. त्याप्रमाणे उच्च शिक्षण मंत्र्यांनी १0 आॅक्टोबर रोजी एमफुक्टो संघटना व शासनाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत चर्चा केली आणि संघटनेच्या मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले आणि यासंदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाईल, असे सांगितले. त्यामुळे एमफुक्टो, नेट सेट, पीएच.डी. व सीएचबी संघटनेने संप मागे घेतला होता. संप मागे घेतल्यानंतर शासनाने कोणताही शासन निर्णय काढला नाही. त्यामुळे शासनाने प्राध्यापकांची बोळवण केली आहे. दीड वर्षांपासून प्राध्यापक भरती व इतर विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे पात्रताधारक प्राध्यापकांचे नुकसान होत आहे. उच्च शिक्षण व वित्त विभागाने पंधरा दिवसांमध्ये उच्च शिक्षण विभागाच्या सुधारित इतिवृत्तानुसार प्राध्यापक भरती व इतर मागण्यासंदर्भात शासन निर्णय काढावा. अन्यथा पात्रताधारक प्राध्यापकांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नेट-सेट, पीएच.डी. व सीएचबी कृती समितीने दिला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाProfessorप्राध्यापक