शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पत्नीवर हल्ला करून प्राध्यापक पतीचा आत्महत्येचा प्रयत्न !

By admin | Updated: January 30, 2017 03:30 IST

कौटुंबिक कलहातून घडली घटना

मूर्तिजापूर, दि. २९-कौटुंबिक कलहातून प्राध्यापक पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील प्रतीक नगर (हातगाव) परिसरात २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. दोघांचीही प्रकृती गंभीर असून, पत्नीवर खासगी तर पतीवर सवरेपचार रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहेत. कारंजा-अकोला रोडवरील प्रतीक नगर येथे राहणारे आणि तालुक्यातील घोटा येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश सहदेव वासनिक (५५) यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी ११.३0 ते १२ वाजताच्या सुमारास पत्नी निर्मलावर (५२) घरगुती कलहातून धारदार चाकूने वार केले. त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली व दोघांनाही उपचारासाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दोघांचीही प्रकृ ती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. प्रकाश वासनिक यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात तर निर्मला वासनिक यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.प्रकाश वासनिक हे गेल्या आठवड्यापासून घरगुती कलहामुळे त्रस्त होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा शुभम (२२) हा नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर मुलगी अमरावतीला शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक गणेश कोथळकर आदी करीत आहेत.