शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

  १५ जूनपर्यंत शेतमाल खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी -  कृषी मंत्र्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:33 IST

शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका व ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज यंत्रणेला दिले.

अकोला : शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका व ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज यंत्रणेला दिले. यावेळी ते म्हणाले, की खरेदी केंद्रावर येणारा माल हा शेतकऱ्यांचाच आहे की नाही, याची पडताळणी करण्यात यावी, शेतकºयाच्या नावाखाली व्यापारी माल विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे  स्पष्ट निर्देश ना. भुसे यांनी दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा आज अकोला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात आला. या बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तारेणिया उपस्थित होते.अमरावती विभागात लागवडयोग्य क्षेत्र ३५.१४ लाख हेक्टर इतके असून, खरीप हंगामाचे क्षेत्र हे ३२.३२ लाख हेक्टर इतके आहे. शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकºयांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घ्यावी, युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकºयांना युरिया कमी पडणार नाही; मात्र जमिनीचा पोत चांगला राहावा, यासाठी शेतकºयांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकºयांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

थकबाकीचा विचार न करता पीक कर्ज द्यावे!जे जे शेतकरी मागणी करतील, त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया बँका व बँकांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही ना. भुसे यांनी यावेळी दिला. त्या त्या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाºयांनी दर चार दिवसांनी आढावा घेऊन कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ना. भुसे यांनी दिले.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रministerमंत्री