शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांची संपत्ती गोठविण्याची प्रक्रिया रखडली!

By admin | Updated: December 13, 2014 00:03 IST

१७३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता : एसीबीची पत्रे गृह विभागाकडे धूळ खात.

नितीन गव्हाळे/ अकोला गत दोन वर्षांत ज्या लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या त्यापैकी ४८ जणांची जवळपास १७३ कोटी रूपयांची बेहिशोबी संपत्ती गोठविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याच्या गृह विभागाकडे परवानगी मागितली.मात्र, वर्ष उलटल्यानंतरही गृह विभागाकडून परवानगी मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पाठपुराव्यासाठी दिलेल्या स्मरणपत्रांच्या नशिबीही केराची टोपलीच आल्याने एकूणच ही प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २0१३ साली लाचखोरीच्या ५५३ प्रकरणांमध्ये ७५0 आरोपींवर कारवाई केली. २0१४ वर्षामध्ये कारवायांचा धुमधडाका सुरूच आहे. यार्षी ११७५ प्रकरणांमध्ये १५९१ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ४८ लाचखोरांकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचे एसीबीला आढळून आले. ही संपत्ती गोठविण्यात यावी, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाच्या गृहविभागाकडे परवानगी मागितली; परंतू वर्ष उलटूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी मिळाली नाही. एवढेच नव्हे, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वारंवार स्मरणपत्र दिल्यानंतरही गृह विभागाकडून प्रत्युत्तर मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात युतीचे सरकार सत्तारूढ झाले. निवडणूक काळात भ्रष्टाचाराविरूद्ध रणशिंग फुंकणारे हे सत्ताधारी पक्ष या महत्वाच्या मुद्याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.  *परिक्षेत्रनिहाय प्रलंबित असलेली प्रकरणेपरिक्षेत्र         लाचखोर                          बेहिशोबी संपत्तीमुंबई             ६                       ३ कोटी ४३ लाख ७५ हजार रूपये ठाणे              ८                       १५७ कोटी लाख ३१ लाख ४९७ रूपयेपुणे               ८                       ३ कोटी ५५ लाख ७७ हजार ९५३ रूपयेनाशिक           ७                        २ कोटी ८८ लाख ४१ हजार ६१७ रूपये नागपूर         १0                      १ कोटी ८0 लाख १३ हजार ९५६ रूपयेअमरावती        २                                  १५ लाख ५७ हजार ७00 रूपये औरंगाबाद        ३                                  ६४ लाख ३२ हजार ८६८ रूपयेनांदेड              ४                                  ३ कोटी ६७ लाख ४३ हजार ७६५ रूपये