शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या आकृतिबंधाची प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:14 IST

अकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदू नामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी आहेत किती, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु मागील पाच महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांच्या संख्येचा ताळमेळ जमेना!कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदू नामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी आहेत किती, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु मागील पाच महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे. महापालिकाच नव्हे, तर इतरही प्रशासकीय यंत्रणांमध्ये तेथील उपलब्ध कर्मचार्‍यांच्या संख्येनुसार कामकाज पार पडते. अर्थात, त्या-त्या विभागात कार्यरत कर्मचारी किती आणि ते कोणत्या संवर्गातील आहेत, ही बाब महत्त्वाची ठरते. बिंदू नामावली प्रक्रिया असो किंवा पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याकडे ‘मास्टरी’ असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळेच मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाक डे सादर केला आणि त्याला मंजुरी मिळाली. बिंदू नामावली अंतर्गत सरळसेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपाच्या जलप्रदाय विभाग, नगररचना, बांधकाम आदी विभागात तांत्रिक संवर्गातील कर्मचार्‍यांची अपुरी संख्या पाहता आयुक्त लहाने यांनी तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले. यादरम्यान, महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण कर्मचारी किती आणि विभागवार कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याची अचूक माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले. ही बाब पाहता महापालिकेचा आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. आकृतिबंधाची प्रक्रिया क्लिष्ट असली, तरी त्याची गरज ओळखून सामान्य प्रशासन विभागामार्फत ही प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती. अवघ्या दोन-तीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील जुजबी माहिती प्रशासनाकडे सादर केली. त्यानंतर कोठे माशी शिंक ली देव जाणे, ही प्रक्रियाच ठप्प पडल्याचे दिसून येत आहे. 

कर्मचार्‍यांचा मनमानी कारभारमहापालिकेचा आकृतिबंध तयार नसल्यामुळे कामचुकार कर्मचार्‍यांमध्ये आनंदीआनंद आहे. अनेक कर्मचारी बिळात दडून बसल्यासारखे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. मनपाच्या आस्थापनेवरील २ हजार २00 कर्मचारी पाहता बहुतांश कर्मचारी दिवसभर असतात तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो. अशा क ामचुकार कर्मचार्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू करण्याची नितांत गरज आहे. -