शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून

By admin | Updated: July 13, 2015 02:01 IST

ग्रामपंचायतींची निवडणूकीचे ऑनलाइन भरावे लागणार नामनिर्देशनपत्र.

अकोला: जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ऑनलाइन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, १३ जुलैपासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये सुरू होत आहे. ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरून, त्याची प्रिंट  उमेदवारांना तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे.जिल्हय़ातील ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणार्‍या अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणुकीसाठी ऑनलाइन नामनिर्देशनपत्र दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू होत आहे. १८ व १९ जुलै हे सुटीचे दोन दिवस वगळता २0 जुलैपर्यंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष किंवा इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरता येणार आहे. ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर त्याची काढून उमेदवारांना तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे.