शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

स्वच्छ सर्वेक्षणात उच्चतम कामगिरी करणाऱ्या शहरांवर बक्षिसांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:44 IST

‘अमृत’ शहरांसाठी २० कोटी रुपये तसेच ‘नॉन अमृत’ शहरांसाठी अडीच कोटींची रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अकोला: स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मध्ये उच्चतम कामगिरी करणाºया ‘अमृत’तसेच ‘नॉन अमृत’ महापालिका, नगर परिषदांवर बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. प्रोत्साहनात्मक बक्षीस म्हणून ‘अमृत’ शहरांसाठी २० कोटी रुपये तसेच ‘नॉन अमृत’ शहरांसाठी अडीच कोटींची रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामांचे मूल्यमापन केले जात आहे. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. संबंधित स्वायत्त संस्थांचे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ अंतर्गत मूल्यापन करण्यात आले होते. आता स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मध्ये उच्चतम कामगिरी करणाºया ‘अमृत’ तसेच ‘नॉन अमृत’ शहरांसाठी प्रोत्साहनात्मक बक्षीस म्हणून अडीच ते २० कोटींची रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी शहरांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शासनाने बक्षीस योजना जाहीर केली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ मध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली होती, हे येथे उल्लेखनीय.अकोला शहराला अडीच कोटींचे अनुदानस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाने जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या तपासणीत अकोला शहर हगणदरीमुक्तअसल्याचे आढळून आले होते. त्या धर्तीवर अकोला शहरासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अडीच कोटींचे अनुदान प्राप्त झाले.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान