अकोला : शहरातील अक्रम नौरंगाबादी हत्याकांडामधील आरोपी शेख साजीद शेख सुलतान (३५) या बंदीवानाचा शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने कारागृहातच मृत्यू झाला. माजी नगरसेवक फरीद पहेलवान यांचा पुतण्या शेख साजीद शेख सुलतान याला अक्रम नौरंगाबादी हत्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी २५ जून रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याची ५ जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सहा महिन्यांपासून शेख साजीद हा कारागृहातील न्यायाधीन बंदी होता. तो शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास शौचालयामध्ये गेला. त्यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो तेथेच कोसळला. त्याच्या डोक्यालाही इजा झाली. त्याला कारागृहातील कर्मचार्यांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले; परंतु डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले. शेख साजीद हा कारागृहात मृत्यू पावणारा तिसरा बंदीवान आहे.
अकोला कारागृहात कैद्याचा मृत्यू
By admin | Updated: January 3, 2015 00:40 IST