शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची खरेदी-विक्री करणारे कारागृहात

By admin | Updated: March 2, 2016 02:47 IST

पाच जणांसह महिलेचा समावेश.

अकोला: हरिहरपेठेतील रहिवासी असलेल्या एका महिलेस गुंगीचे औषध देऊन तिची गुजरातमध्ये खरेदी-विक्री करणारे गुजरातमधील पाच जण तसेच अकोल्यातील एका महिलेची न्यायालयाने मंगळवारी कारागृहात रवानगी केली. या सहा आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.हरिहरपेठ येथील रहिवासी संगीता सुधाकर तायडे या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवते. तिच्या शेजारी साजिदा परवीन शकील अहमद ही महिला राहते. तिने संगीताला विवाह करण्यासाठी वारंवार म्हटले; मात्र तिने विरोध केला. त्यानंतर साजिदा परवीन हिच्या घरी काही पाहुणे आल्याच्या बहाण्याने संगीताला घरी बोलावले. त्यानंतर गुलकंद व चहामध्ये गुंगीचे औषध देऊन तिची गुजरातमध्ये विक्रीचा व्यवहार पक्का केला. संगीताला गुजरातमध्ये नेण्यात येत असताना नंदुरबारनजीक नवापूर येथे अचानक जाग आल्याने तिने आरडाओरड केली. या प्रकाराची माहिती नंदुरबार जीआरपीला मिळताच त्यांनी संगीताची सुटका केली तसेच गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील रहिवासी भरतभाई कादीरभाई परमार, अशोकभाई वालजीभाई सोलंकी, शंकरभाई रामजीभाई परमार, शेख मोहम्मद खालीद अशपाकउर रहमान, वाहिद दिवान हैदर शाह यांना अटक केली. या आरोपींना जुने शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. जुने शहर पोलिसांनी हरिहरपेठेतील रहिवासी साजिदा परवीन शकील अहमद हिलादेखील अटक केली. या सहा आरोपींना न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.