शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची पूर्वतयारी जोरात

By admin | Updated: April 27, 2017 14:00 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे.

डीएमईआर संचालकांनी घेतला आढावा : कार्यक्रमाचा आराखडा निश्‍चितअकोला : राज्य शासनाकडून सहा जिल्हय़ांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, अकोला जिल्हय़ाचाही समावेश आहे. यानुषंगाने १ मेपासून जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे. याबाबतचा आराखडा निश्‍चित करण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, यानुषंगाने जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतची जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रदिनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हय़ात हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या असून, ते स्वत: या अभियानाच्या पूर्वतयारीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. शिंगारे व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी अभियानाच्या पूर्वतयारीचा व सूक्ष्म आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. डीएमईआर संचालकांनी अभियानाशी संबंधित आवश्यक सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.असा आहे आराखडाया अभियानांतर्गत २ ते २७ मेपर्यंत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन आरोग्यविषयक विचारपूस करणार आहेत. आजारी किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून त्यांच्याकडून २५ मुद्यांची प्रश्नावली भरून घेण्यात येईल. ही प्रश्नावली ऑनलाइन असून, ती रुग्णाच्या आधार व रेशन कार्डशी लिंक राहणार आहे. अशाप्रकारे रुग्णांचा डाटा तयार झाल्यानंतर ही माहिती मुंबईला पाठविली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर आजाराच्या स्वरूपानुसार ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी उपचार करण्यात येतील.