शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या गरजेनुसार विकास कामांना प्राधान्य

By admin | Updated: November 16, 2016 02:07 IST

मूलभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर; पालकमंत्र्यांनी दिली माहिती.

अकोला, दि. १५- महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी मंगळवारी नगर विकास विभागाने २५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यापैकी २५ कोटींचा निधी अकोला शहरासाठी प्राप्त झाल्याची माहिती राज्याचे नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. अकोलेकरांची गरज लक्षात घेऊन ठोस विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्यामुळेच आजपर्यंत कोट्यवधींचा निधी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यात आणखी २५ कोटींची भर पडली. मूलभूत सुविधेंतर्गत शहरासाठी २५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला.या निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील ठोस विकासकामांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रथमच झोननिहाय बैठका घेऊन नगरसेवकांसह अकोलेकरांना कोणती कामे अपेक्षित आहेत, याबद्दल सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. निधीतून होणारी कामे ही दज्रेदार व नियोजित वेळेतच पूर्ण होतील यासाठी कटाक्षाने लक्ष दिले जाईल. विकास कामाच्या नियोजनाची प्रक्रिया येत्या दोन दिवसात सुरू होईल. जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे २५ कोटींचा निधी प्राप्त होण्यास मदत झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखित निधीचे विनियोजन केले जाईल. नेकलेस रस्त्याचे भाग्य उजळले२५ कोटींच्या निधीतून शहरातील ठोस विकास कामांवर भर दिला जाईल. यामध्ये नेकलेस रस्त्याचे भाग्य उजळले असून रस्त्यालगतचे विजेचे खांब हटवून दुर्गा चौक ते सिव्हिल लाइन चौकापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण केले जाईल. या माध्यमातून दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, अग्रसेन चौक ते बस स्थानक, मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन, सिव्हिल लाइन ते दुर्गा चौक असा रस्त्यांचा चतुष्कोन साधला जाणार आहे.कॅनॉल रस्त्यासाठी महसूल मंत्र्यांसोबत चर्चाजुने शहरातील कॅनॉल रोड ते जुना बाळापूर नाका ते राष्ट्रीय महामार्गालगच्या नवीन किराणा मार्केटपर्यंत सुमारे ३ किलोमीटर अंतराच्या प्रमुख रस्त्याचा तिढा निकाली काढण्यासाठी महसूल मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले. महापालिकेला दिलासामूलभूत सुविधेंतर्गत प्राप्त निधीत महापालिकेला एकूण निधीच्या ५0 टक्के हिस्सा जमा करावा लागतो. त्यानंतरच विकासकामांसाठी शासनाची मंजुरी मिळते. राज्यातील ह्यडह्णवर्ग महापालिकांची आर्थिक स्थिती ध्यानात घेता ५0 टक्के निधीची अट शिथिल करून १00 टक्के निधी देण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे.