शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महाकाली हॉटेलवर छापा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच पूर्वीच्या  महाकाली वाइन बार व आताच्या महाकाली हॉटेलवर  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या  विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  रात्री छापा टाकला. यावेळी अवैधरीत्या विक्री करण्यात येत  असलेली ११ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली  असून, हॉटेलच्या दोन्ही संचालकांना ताब्यात ...

ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या  विशेष पथकाचे टाकला छापा ११ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली  हॉटेलच्या दोन्ही संचालकांना ताब्यात घेऊन  त्यांच्यावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच पूर्वीच्या  महाकाली वाइन बार व आताच्या महाकाली हॉटेलवर  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या  विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  रात्री छापा टाकला. यावेळी अवैधरीत्या विक्री करण्यात येत  असलेली ११ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली  असून, हॉटेलच्या दोन्ही संचालकांना ताब्यात घेऊन  त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.राजकीय पदाधिकार्‍यांचे राजाश्रय असलेल्या महाकाली  हॉटेलमधून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री  करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक  एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख  हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने या  परिसरात सापळा रचून दारूचा साठा असल्याचे निश्‍चित  होताच छापा टाकला. यामध्ये विदेशी दारू जप्त करण्यात  आली असून, ही दारू तब्बल ११ हजार रुपयांची  असल्याची माहिती आहे. यावेळी महाकाली हॉटेलचे  संचालक सचिन अशोकसिंह रघुवंशी व महेंद्रसिंह  अशोकसिंह रघुवंशी रा. तोष्णीवाल ले-आउट या दोघांना  ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई  करण्यात आली आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख  हर्षराज अळसपुरे यांनी केली.

पोलीस मुख्यालयासमोरील जुगारावर छापापोलीस मुख्यालयासमोरील कमला नेहरुनगरमध्ये सुरू  असलेल्या जुगार अड्डय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.  राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज  अळसपुरे यांनी छापा टाकून सहा जणांना अटक केली.  त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात  आला.येथून जुने शहरातील रहिवासी जगदीश मानमोडे, हिंगणा  फाटा येथील रहिवासी नाजुकराव अहीर, भौरद येथील  कैलास मारोती सोनोने, तारफैलमधील बबलू गोमाजी  डोंगरे, हरिहरपेठेतील अनिल गायकवाड व कैलास टेकडी  येथील रहिवासी अशोक शाहू या सहा जणांना अटक  केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.  आठ दिवसांमध्ये या ठिकाणच्या जुगार अड्डय़ावर ही दुसरी  कारवाई आहे.