अकोला: आपल्या संकल्प पूतीर्साठी अकोल्यावरून राजस्थान येथील खाटु शाम व जीन माता दर्शन करून चोवीस दिवसात तब्बल तेराशे किमी अंतर पायदळवारी करणाºया गणेश शर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गणेश शर्मा यांनी आपली ही संकल्प पायदळ यात्रा अकोला शहरातील गांधी चौकातून प्रारंभ केली. अनेक गावातून मार्ग काढीत राजस्थान येथील खाटु शाम व जीन माता धामला भेट देऊन ते परत अकोला येथे पोहचले.राजस्थानी समाज संघटनाच्या वतीने गुरुवारी गांधी चौकातील आंबा माता मंदिर परिसरात गणेश शर्मा यांचा आ. गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते व खाटु शाम परिवाराचे कमलकिशोर अग्रवाल,रा.ब्रा .संघटनचे अध्यक्ष संजय शर्मा, अग्रवाल समाजाचे उमेश खेतान, रामदेवबाबा सेवा समितीचे ओमप्रकाश गोयनका ,राम उत्सव समितीचे भरत मिश्रा यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी गणेश शर्मा यांनी आपल्या प्रवासाचे अनुभव कथन करीत महानगरातील नागरिकांच्या सामाजिक स्वास्थासाठी आपण ही संकल्प पायदळयात्रा पूर्ण केली असल्याचे सांगितले .संचालन भरत मिश्रा यांनी तर आभार जयभोले रसवंतीचे राजू शर्मा यांनी केले. यावेळी संतोष अग्रवाल, शाम पचोरी, दिलीप खत्री, राधेशाम शर्मा,अभय बिजवे ,गोविंद शर्मा, गिरीराज जोशी,विक्रांत देशमुख, राजू मंजुळकर समवेत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
अकोला ते राजस्थान पायदळ वारी करून परत आलेल्या भाविकाचा गौरव
By atul.jaiswal | Updated: December 1, 2017 15:37 IST
अकोला: आपल्या संकल्प पूतीर्साठी अकोल्यावरून राजस्थान येथील खाटु शाम व जीन माता दर्शन करून चोवीस दिवसात तब्बल तेराशे किमी अंतर पायदळवारी करणाºया गणेश शर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अकोला ते राजस्थान पायदळ वारी करून परत आलेल्या भाविकाचा गौरव
ठळक मुद्दे चोवीस दिवसात कापले तब्बल तेराशे किमी अंतर. खाटु शाम व जीन माता धामला भेट देऊन ते परत अकोला येथे पोहचले.