शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १६ गावांतील जलशुद्धीकरण यंत्रे परत घेण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 12:21 IST

अकोला : जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली; मात्र शुद्ध पाण्याची मागणीच नसल्याने १६ गावांतील यंत्रे परत घेऊन ती इतरत्र बसविण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे.

अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली; मात्र शुद्ध पाण्याची मागणीच नसल्याने १६ गावांतील यंत्रे परत घेऊन ती इतरत्र बसविण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता खराब असलेल्या २० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५७ गावांमध्ये यंत्रे बसविण्याला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी अनेक गावांमध्ये यंत्रे बसविण्यात आली; मात्र अनेक गावांमध्ये यंत्रे बंद होती. त्यापैकी आठ गावांतील संयंत्रे सुरुवातीपासूनच बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सर्वच ग्रामपंचायतींना अंतिम नोटीसही बजावली होती. त्यामध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची गरज नसल्यास इतर गावांमध्ये बसविण्यासाठी ती परत घेण्यात येतील, याबाबत म्हणणे सादर करण्याचे बजावले होते. त्यानंतर आता १६ गावांना नोटीस बजाविण्यात येत आहे. त्यासाठी उद्या बुधवारी जिल्हा परिषदेत संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.- यंत्रे परत घेतली जाणारी गावे!अकोला : आपोती बुद्रूक, दहीगाव गावंडे, धोतर्डी, लोणी, यावलखेड, निंबी मालोकार. अकोट : तरोडा, कावसा बुद्रूक, लामकाणी. बार्शीटाकळी : टिटवा, दगडपारवा. मूर्तिजापूर : लाखपुरी, रोहणा, मुंगशी. तेल्हारा : उबारखेड, नर्सिपूर या गावांतील यंत्रे परत घेतली जाणार आहेत.- अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बंदग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी असलेली जलशुद्धीकरण संयंत्रेच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, टिटवा कान्हेरी सरप, एरंडा, घोटा येथे जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी येथे पंप बंद होते.- १० ते २५ पैसे लीटरने पुरवठाग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ग्रामपंचायतींच्या देखरेखीखाली ती चालविली जातात. त्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क घेतले जाते. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १० पैसे लीटर, तर काही गावांमध्ये १५ आणि २५ पैसे लीटरप्रमाणे शुल्क घेतले जाते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद