शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पॉस मशीनद्वारे शंभर टक्के धान्य वाटपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:23 IST

अकोला : धान्याचे वाटप करण्यासाठी शासनाने संगणकीकृत पॉस मशीन दिल्या आहेत. दिवाळीत त्यातून ७५ टक्के वाटप झाले. पुढील महिन्यात १00 टक्के धान्य वाटप पॉस मशीनद्वारेच केले जाईल, त्यातून धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सांगितले. 

ठळक मुद्देद्वारपोच योजनेतून गाठला ७५ टक्के वाटपाचा टप्पालाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धान्याचे वाटप करण्यासाठी शासनाने संगणकीकृत पॉस मशीन दिल्या आहेत. दिवाळीत त्यातून ७५ टक्के वाटप झाले. पुढील महिन्यात १00 टक्के धान्य वाटप पॉस मशीनद्वारेच केले जाईल, त्यातून धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सुधारित धान्य वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची १ ऑक्टोबरपासून द्वारपोच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये गोदाम ते स्वस्त धान्य दुकानापर्यंत थेट धान्याची वाहतूक सुरू आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात पुरवठा अधिकारी कार्यालयाने द्वारपोच योजनेचे नियोजन केले आहे. त्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम होत असल्याने जिल्ह्यात द्वारपोच योजना यशस्वी झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. चालू महिन्यात दिवाळीपूर्वी गहू आणि तांदूळ मिळून ८१,५00 क्विंटल धान्याची उचल भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून करण्यात आली. वाहतूक कंत्राटदारामार्फत अकोला शहर आणि जिल्ह्यातील दुकानांमध्ये दिवाळीपूर्वीच शंभर टक्के पुरवठा करण्यात आला. सर्वांच्या समन्वयाने योजना जिल्ह्यात उत्कृष्टपणे राबवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणारे धान्य पॉस मशीनद्वारेच दिले जाणार आहे. त्यामुळे धान्याचा काळाबाजार करण्याची संधी पॉस मशीनच्या वापरातून मोडीत निघणार आहे. दुकानदार किंवा यंत्रणेतील कोणीही तसा प्रयत्न केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. 

लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य मिळणारद्वारपोच योजनेतून दुकानदारापर्यंत संपूर्ण धान्य पोहचवले जात आहे. त्यामुळे दुकानदारांना लाभार्थ्यांना मंजूर असलेल्या परिमाणाएवढे शंभर टक्के धान्य द्यावेच लागणार आहे. लाभार्थ्यांनी दरमहा आपल्या हक्काच्या धान्याची उचल करावी, दुकानदारांना मागणी करावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी शिंदे यांनी केले आहे.