शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ८१० गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:07 IST

अकोला : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ८१० गावांतील स्रोतांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत.

अकोला : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ८१० गावांतील स्रोतांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कितपत सुरक्षित आहेत, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे मान्सूनपूर्व विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांतर्गत एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ८१० गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. या गावांमधील तब्बल ४ हजार ९०२ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक नमुने अकोला तालुक्यातील गावांचे घेण्यात आले आहेत.तालुकानिहाय सर्वेक्षणतालुका - ग्रामपंचायती - गावे - पाण्याचे स्रोतअकोला - ९८ - १५२ - १०७१अकोट - ८४ - १३७ - ६४१बाळापूर - ६६ - ८६ - ४९२बार्शीटाकळी - ८२ - ११९ - ९२६पातूर - ५७ - ८१ - ५५५तेल्हारा - ६२ - ९१ - ४११मूर्तिजापूर - ८६ - १४४ - ८०६------------------------------एकूण - ५३५ - ८१० - ४९०२ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच ते पाणी पिण्यास किती योग्य आहे, त्यावरून पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.- डॉ. जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद