शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील मान्सूनपूर्व कापसाचे उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:46 IST

अकोला : पश्‍चिम विदर्भात (वर्‍हाड)काही भागात मान्सूनपूर्व  कापूस पीक घेतले जाते; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे  सुरुवातीला या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. नंतर  हे पीक  फुलोर्‍यावर आले, तेव्हा मात्र सतत जोरदार पाऊस पडल्याने  फुलोरा गळाला; तसेच हवामानात सारखे बदल होत गेल्याने  कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. आता तर पांढरी माशीचा  प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे  कापसाचे  नुकसान झाले असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअचानक पडलेल्या जोरदार पावसाचा परिणाम पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव वाढला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भात (वर्‍हाड)काही भागात मान्सूनपूर्व  कापूस पीक घेतले जाते; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे  सुरुवातीला या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. नंतर  हे पीक  फुलोर्‍यावर आले, तेव्हा मात्र सतत जोरदार पाऊस पडल्याने  फुलोरा गळाला; तसेच हवामानात सारखे बदल होत गेल्याने  कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. आता तर पांढरी माशीचा  प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे  कापसाचे  नुकसान झाले असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.पश्‍चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या  जिल्हय़ात मान्सूनपूर्व कपाशीचे पीक घेतले जाते. त्यासाठीची  तयारी शेतकरी एप्रिल महिन्यातच करीत असतात. मे महिन्यात  या कपाशीची पेरणी केली जाते. पश्‍चिम विदर्भातील उन्हाळा  जगजाहीर आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी विहिरी, तलावा तील पाणी संपते. त्यामुळे शेतकर्‍यांना नैऋत्य मोसमी पावसाची  प्रतीक्षा असते. तथापि, यावर्षी पाऊस एक ते दीड महिना उशिरा  आला. या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नसल्याने सुरुवातीला  िपकांना फटका बसला.दरम्यान, कपाशीवर विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला  असून, पांढरी माशीचा जोर वाढत आहे. त्यामुळे आर्थिक  नुकसानाची पातळी गाठण्यापूर्वी शेतकर्‍यांनी शेताचे नियमित  सर्वेक्षण करावे. त्यासाठी २0 झाडे निवडावीत. प्रत्येक पानावर  प्रती दहा माशा दिसल्यास नुकसान वाढण्याची शक्यता असते.  अशा शेतात शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार  कीडनाशकांची फवारणी करू न व्यवस्थापन करावे, तसेच  अनुजीविकरपा, पानावरील ठिपक्यांचा-रोगाचा काही भागात  प्रादुर्भाव आहे. वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे नियमित क पाशीवर हिरवी, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुड तुड्यांचा प्रभाव कमी झाला असला, तरी काही भागात  थोड्याफार प्रमाणात कपाशीवर तुडतुडे दिसत आहेत. 

सोयाबीनचे पीक फुलले !सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक फुलले  आहे. अनेक ठिकाणी शेंगांचा चांगलाच बहर आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चमुने केलेल्या सर्वेक्षणात  अनेक भागात सोयाबीनच्या एका झाडाला ३0 ते ३५ शेंगा  आल्या आहेत.

वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे मान्सूनपूर्व कापसावर पांढरी  माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर नियमित कपाशीवर हिरवी व  गुलाबी बोंडअळी आली आहे. शेतकर्‍यांनी दररोज शेताचे  सर्वेक्षण करू न किडींचे व्यवस्थापन करावे.- डॉ. अनिल कोल्हे,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.