शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आधीच उकाडा; त्यात आकस्मिक भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची वाढलेली मागणी व पुरवठा यांचा  ताळमेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत  करावी लागत असून, गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात  शहर व ग्रामीण भागात आकस्मिक भारनियमन करण्या त येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारीही  आकस्मिक भारनियमन करण्यात आले. सायंकाळी  पाच वाजेपर्यंत सर्वच भागातील भारनियमन मागे घेण्या त ...

ठळक मुद्देविजेचा तुटवडा घामधारांनी नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची वाढलेली मागणी व पुरवठा यांचा  ताळमेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत  करावी लागत असून, गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात  शहर व ग्रामीण भागात आकस्मिक भारनियमन करण्या त येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारीही  आकस्मिक भारनियमन करण्यात आले. सायंकाळी  पाच वाजेपर्यंत सर्वच भागातील भारनियमन मागे घेण्या त आले.  वीज देयकांची वसुली व वीज गळतीच्या प्रमाणाचा  अभ्यास करून जिल्हय़ाची ग्रुपनिहाय विभागणी केली  आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास ‘ए’, ‘बी’,  ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, ‘जी १’, ‘जी २’ व ‘जी ३’  या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केले जाते. गत दोन  दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावि तरणच्यावतीने जिल्हय़ातील ई, एफ, जी १, जी २ व  जी ३ या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केल्या जात  आहे. रविवारीही जिल्हय़ातील विविध फिडरवर  त्यांच्या ठरावीक वेळापत्रकानुसार भारनियमन करण्यात  आले. सकाळी व सायंकाळी दोन टप्प्यात सात तासां पर्यंत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना  प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गत काही  दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला  आहे. घामधारांनी नागरिक आधीच त्रस्त असताना  विजेच्या भारनियमनाने त्यात भरच पडली आहे.  पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठय़ाअभावी पाणी  मिळत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढच झाली  आहे. बाजारपेठांमध्ये वीज पुरवठा खंडित राहत  असल्याने त्याचा परिणाम अनेक व्यवसायांवरही होत  आहे.