शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा प्रताप; चक्क रस्त्यावरच उभारणार पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

शहरातील सर्व प्रमुख रस्ते, चाैकांमध्ये फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेत वाहने ठेवण्यासाठी पार्किंग उपलब्ध नाही, नागरिकांना रस्त्यालगत वाहने उभी करावी ...

शहरातील सर्व प्रमुख रस्ते, चाैकांमध्ये फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेत वाहने ठेवण्यासाठी पार्किंग उपलब्ध नाही, नागरिकांना रस्त्यालगत वाहने उभी करावी लागत असल्याने वाहतूक काेंडी हाेत आहे. या समस्यांचे मनपा प्रशासनाने निराकरण करणे अपेक्षित असताना खुद्द प्रशासनाकडून चक्क रस्त्यावर पार्किंग उभारण्याला संमती दिल्याचे समाेर आले आहे. यामध्ये शहरात सर्वाधिक गजबजलेल्या गांधी चाैकातील कवच आर्केड संकुलाच्या मागील रस्त्याचा समावेश आहे.

विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी शहरात वाहनतळ उपलब्ध नाहीत. रस्त्यालगत जागा दिसेल त्याठिकाणी वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक काेंडीची समस्या निर्माण झाली आहे. अर्थात, या समस्येवर प्रभावी ताेडगा काढण्याची गरज असताना थातूरमातूर उपाययाेजना केल्या जात असल्याचे समाेर आले आहे. मनपाच्या मालकीच्या १३ ठिकाणी वाहनतळ उभारण्यासाठी बाजार विभागाने निविदा प्रसिद्ध केली हाेती. यापैकी केवळ तीन निविदा प्राप्त झाल्या असून, त्यातही रस्त्याच्या मधाेमध वाहनतळ उभारण्याच्या निविदेचा समावेश आहे. कहर म्हणजे ही निविदा प्रभारी आयुक्त अराेरा यांनी मंजूर केली असून, प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१३ पैकी केवळ तीन जागेची निविदा

मनपा प्रशासनाने शहरात १३ ठिकाणी पार्किंगची सुविधा देण्याच्या उद्देशातून निविदा प्रसिद्ध केली हाेती. यापैकी केवळ तीन जागेसाठी निविदा प्राप्त झाली. यामध्ये मनपाची आवारभिंत, नवीन कापड मार्केटलगतचे श्रीराम गॅरेजचा परिसर तसेच गांधी चाैकातील कवच आर्केड संकुलामागील मुख्य रस्त्याचा समावेश आहे.

..तर जबाबदार काेण?

कवच आर्केड संकुलामागे अनेक खासगी हाॅस्पिटल, औषधी दुकाने, खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने असल्यामुळे याठिकाणी बाराही महिने अकाेलेकरांची गर्दी दिसते. या परिसरात काही दुर्घटना घडल्यास नागरिकांना बाहेर निघणे मुश्कील हाेणार आहे. त्यावेळी हाेणाऱ्या हानीची जबाबदारी काेणाची, असा सवाल उपस्थित हाेत आहे.