शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधील मतभेद झाकण्यासाठी आघाडीच्या एकीवर स्तुतिसुमने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST

महाविकास आघाडीचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे महापौर संदीप जोशी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. असा एकतर्फी ...

महाविकास आघाडीचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे महापौर संदीप जोशी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. असा एकतर्फी निकाल भाजपला तर सोडा; पण काँग्रेसलाही अपेक्षित नव्हता. हे यश मिळविण्यासाठी वंजारी यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच नाकारता येणार नाही. मात्र, पक्षांतर्गत धुसफुसीवर पांघरूण घालण्यासाठी या विजयाला बहुजनवादाचा सदरा चढविण्याचेही काम जोरात सुरू आहे. मात्र, यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आ. अनिल सोले हे भाजपकडून लढले तेव्हा यांच्या विरोधात हा बहुजनवाद का चालला नाही, यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. संदीप जोशी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेले खा. रामदास तडस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खा. सुनील मेंढे, आ. परिणय फुके, आ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे आदी नेते बहुजन समाजातीलच आहेत. जनतेची नाडी ओळखणाऱ्या नेत्यांना हवेचा अंदाज कसा आला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

घातपात झाल्याची भावना

- भाजपची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे नेटवर्क व दिग्गज नेत्यांची फौज पाहता पदवीधरमध्ये पराभव होणे शक्य नाही. मात्र, त्यानंतरही चक्कर आणणारा निकाल आला. जवळच्यांनीच घातपात केला. अपेक्षित साथ मिळाली नाही, अशी भावना जोशी समर्थकांमध्ये आहे. पक्षशिस्तीचा भंग नको म्हणून ते उघडपणे बोलणे टाळत आहेत.

गडकरी समर्थकांचाच पत्ता कट का?

- गेल्या विधानसभा निवडणुकीपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थकांचाच पत्ता का कट केला जात आहे, यावरही आता भाजपमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. लोकमतशी बोलताना भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) यांचे तिकीट ऐनवेळी का कापण्यात आले, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. भंडारा जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार होते. या तीनही आमदारांचे तिकीट कुणाच्या लॉबिंगमुळे व कुणाला खूश करण्यासाठी कापण्यात आले, यावर निकालानंतरही चिंतन झाले नाही. एवढ्यावरच हे सर्व थांबले नाही. आता पदवीधरमध्ये गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनिल सोले यांचे तिकीट कापले. हे करताना गडकरींना खरोखर विश्वासात घेतले गेले का, असा प्रश्न या नेत्याने उपस्थित केला. एकूणच आजवरच्या घडामोडींमुळे नाराज असलेले गडकरी समर्थक आता पदवीधरच्या निकालाचे निमित्त साधून भावना मोकळ्या करू लागले आहेत.