शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

मूर्तिजापूरात प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सव उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 17:20 IST

Pradhan Mantri Swanidhi Mahotsav in Murtijapur : पी.एम.स्वनिधी महोत्सव हा पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबासाठी भारतातील ७५ शहरांमध्ये साजरा करण्याचे ठरविले आहे.

मूर्तिजापूर : कोरोना काळात पथविक्रेत्यांची अंत्यत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी स्वनिधी योजनेतून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला, भविष्यात पथविक्रेत्यांसाठी शहरी भागात विविध सोयी सुविधा उपलब्ध होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नगर परिषद प्रशासन तथा संचालनालय आयुक्त, किरण कुलकर्णी यांनी २२ जुलै रोजी आयोजित पी. एम स्वनिधी महोत्सव कार्यक्रमात पथविक्रेत्यांना संबोधित करताना केले. ते बोलताना पुढे म्हणाले की, फेरीवाले उद्योजक असून त्यांना बळ देण्याचे काम या योजनेतून होत आहे. पथविक्रेतांना हे अनुदान नसून हे कर्ज स्वरूपात वितरण करण्यात आले आहे. असेही ते म्हणाले. 

         पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या स्वनिधी योजनेतून सावलंबी जीवन जगण्याचा मार्ग सुकर व्हावा यासाठी देशातील ७५ शहरात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात एकमेव मूर्तिजापूर नगर परिषद मध्ये आयोजित करण्यात आला. केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पी.एम.स्वनिधी महोत्सव हा पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबासाठी भारतातील ७५ शहरांमध्ये साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याकरीता महाराष्ट्रात ३ महानगरपालिका व एकमेव मूर्तिजापूर नगर परिषदेची निवड करण्यात आली. असल्याचे मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, पी.एम. स्वनिधी महोत्सवाकरिता महाराष्ट्रातून एकमेव पीएम अवार्ड लिस्टेट नगरपरिषद म्हणून स्वनिधी महोत्सवाकरिता निवड होण्याचा बहुमान या नगर परिषदेला मिळाला आहे. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, आयुक्त नगर परिषद प्रशासन मुंबई, किरण कुलकर्णी, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, यावेळी मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे, आमदार किरण सरनाईक, आमदार हरीष पिंपळे, माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे, नगर पालिका संचालनालय आयुक्त किरण कुलकर्णी, जिल्हा प्रशासन अधिकारी बळवंत अराखराव, तहसीलदार प्रदीप पवार, नगर परिषद प्रशासन उपसंचालक श्रीकांत अनारसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खंडसे यांनी मनोगत व्यक्त केले,          स्वनिधी योजने अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याच बरोबर पथविक्रेत्यांचाही सन्मान करण्यात आला. या उत्सवा अंतर्गत रांगोळी, चित्रकला, उखाणे स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. सोबतच पथविक्रेत्यांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमरावतीच्या शिप्रा मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयदीप सोनखासकर यांनी केले. या कार्यक्रमाला पथविक्रेते व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करीत असताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या गिताने सुरुवात करण्यात आली.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला