शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कॅरम संघ व्यवस्थापकपदी प्रभजित बछेर

By admin | Updated: November 4, 2016 02:23 IST

पंच म्हणून विकास मुकादम यांचा सहभाग.

अकोला, दि. ३- आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या वतीने बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे होणार्‍या सातव्या विश्‍व कॅरम स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी अकोल्याचे प्रभजितसिंह बछेर यांची निवड झाली आहे. तसेच विश्‍वचषक स्पर्धेचे पंच म्हणून विकास मुकादम सहभागी होत आहे.ऑल इंडिया कॅरम फेडरेशनतर्फे आयोजित सात दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी आलेल्या खेळाडूंना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंना विजयाकरिता शुभेच्छा दिल्या. पुरुष व महिला दोन्ही गटात भारतीय संघ विजेता आहे; मात्र पुरुष एकेरीचे विजेतेपद श्रीलंकेच्या डीएमडी फर्नांडो यांच्याकडे तर एकेरी विजेतेपद भारताच्या रश्मीकुमारीकडे आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारताच्या पुरुष संघात संदीप देवरू खकर (पेट्रोलियम स्पोर्टस् प्रामोशन बोर्ड), रियाज अकबर अली (एअर इंडिया), प्रशांत मोरे (रिझर्व बँक ऑफ इंडिया), आर.एम. शंकरा (एअर इंडिया) यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक प्रभजितसिंह बछेर आहेत. महिला संघात काजल कुमारी (पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशनल बोर्ड), एस. अपूर्वा (एलआयसी), एम. परिमल देवी, तुबा सेहर (पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशनल बोर्ड) यांचा समावेश असून, भारत भूषण हे व्यवस्थापक आहेत.माजी विजेता रश्मीकुमारी व योगेश परदेशी यांना एकेरी स्पर्धेसाठी इंटरनॅशनल कॅरम फेडरेशनचे वाइल्ड कार्ड प्रवेश दिला आहे. अकोल्याचे विकास मुकादम यांना कॅरम विश्‍व चषक पंच म्हणून श्रीलंका येथील २0१२ च्या स्पर्धेनंतर दुसर्‍यांदा या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. माजी राष्ट्रीय विजेते अरुण केदार भारतीय संघाचे प्रशिक्षक असून, या स्पर्धेसाठी व्ही.डी. नाराण यांना टेक्निकल डायरेक्टर व महेश सेकरी यांना मुख्य पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.या स्पर्धेत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, स्वित्झर्लंड, र्जमनी, फ्रान्स, इटली, झेक प्रजासत्ताक, पोलंड, मालदिव, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया, जापान, बांगलादेश व भारत अशा १७ देशाचा सहभाग असून, भारतीय संघ ५ नोव्हेंबर रोजी बर्मिंगहॅमसाठी रवाना होत आहे. भारतीय कॅरम संघाच्या व्यवस्थापक पदाची संधी अत्यंत महत्त्वाची असून विदर्भ कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. अजहर हुसैन आणि कॅरम फेडरेशन मीडिया कमिटी डायरेक्टर संदीप पुंडकर यांना असल्याचे बछेर यांनी सांगितले.