शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई कीटने मरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 11:24 IST

PPE kit : पीपीई कीट परिधान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. मात्र, या कीटचा अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. अशातच तापमानाचा पारा वाढल्याने पीपीई कीट परिधान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना कोरोना नव्हे, तर पीपीई कीटच जीवघेणी ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. कोविड वॉर्डात रूग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यासह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई कीटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही जात नाही. त्यामुळे पीपीई कीट परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, हाता-पायाला व्रण येणे, चक्कर येणे, युरिन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, थकवा आदी समस्यांना समोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर गेल्याने पीपीई कीट परिधान करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.

 

 

 

नव्या कीटबाबत तक्रारी

कोविड वॉर्डातील पीपीई कीटच्या कापडाचा थीकनेस जास्त आहे.

प्लास्टिक कोटेड असल्याने या कापडातून हवा, पाणीदेखील जात नाही.

त्याचा परिणाम आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आराेग्यावर होत आहे.

 

पीपीई कीट परिधान केल्यानंतर घाम येणे, घशाला कोरड पडणे यासह चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाचा पारा वाढल्याने या समस्यांमध्ये वाढ झाली असली, तरी वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवेला प्राधान्य देत आहेत.

- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभागप्रमुख, मेडिसीन, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या