शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचारी लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. कोविड -१९च्या सुरु असलेल्या लसीकरण केंद्रात फ्रंटलाईन वर्कर म्हणून वीज कर्मचाऱ्यांचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आहे.

कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आणि नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी घरी बसलेल्या नागरिकांना मनोरंजन आणि वातानुकूलित व्यवस्था गरजेची होती. त्याकरिता वीज आवश्यक बाब आहे. ही वीज सेवा अखंडित सुरू ठेवण्यासाठी वीज कर्मचारी अविरत काम करत आहेत.

महावितरणचे तंत्रज्ञ आणि वीज कर्मचारी आपली नियमित देखभाल, दुरुस्तीची कामे, वसुलीची कामे लॉकडाऊनमध्ये करत आहेत. ही कामे करताना त्यांचा प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो. अशा कर्मचार्‍यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. तसेच वीज कर्मचाऱ्यांना वाहिनीच्या पेट्रोलिंग व देखभाल, दुरुस्तीसाठी सतत फिरावे लागते. अशावेळी त्यांचा संपर्क इतर कर्मचाऱ्यांशी येतो. या कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनच्या आपत्कालिन परिस्थितीतही वीज कर्मचारी काम करत आहेत. मात्र, त्यांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स... लसीकरणाची अंमलबजावणी नाही

फ्रंटलाईन वर्करमध्ये आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आलेला नाही तसेच लससुद्धा देण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाने एक पत्र काढून तिन्ही वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राधान्याने लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, याबाबतची कोणतीही अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही.

बॉक्स... अकाेल्यातील २६ कर्मचाऱ्यांची काेकणात सेवा

कोकणात जून २०२०मध्ये निसर्ग चक्रीवादळ आले होते. या वादळाने कोकणातील शेकडो गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गावातील विजेचे खांब उन्मळून पडले होते. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अकोला परिमंडळातून २६ जणांचा चमू कोकणात पाठविण्यात आला होता. या वीज कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवस अहोरात्र काम करून मदत केली. त्यानंतर यापैकी चारजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

बॉक्स ...

वर्षभरात तिघांचा काेराेना बळी

महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात म्हणजेच अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यांत वर्षभरात २२७ कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत तर सध्या ४७ सक्रिय रुग्ण आहेत तर तीनजणांचा मृत्यू झाला आहे. महापारेषण कंपनीतही अशीच स्थिती आहे.

काेट....

कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता, अहोरात्र झटणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा आणि कोविड - १९च्या लसीकरण मोहिमेत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटक या संघटनेने केली आहे.

गोपाल गाडगे सर्कल सचिव इंटक

काेट..

वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलेले नाही आणि लसीकरणामध्ये प्राधान्यसुद्धा दिलेले नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून, त्यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आम्ही वर्कर्स फेडरेशनतर्फे १७ मे रोजी राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.

- कॉ. कृष्णा भोयर, सरचिटणीस

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन