शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयातील बत्ती गूल; ओपीडीतील रुग्णसेवा प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:50 IST

सर्वोपचार रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी रुग्णसेवा प्रभावित झाली होती.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी रुग्णसेवा प्रभावित झाली होती. दरम्यान, एक्स-रे, सोनोग्राफी यासह इतर तांत्रिक तपासणीमध्ये रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला असून, रुग्णांना तपासणीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी सकाळपासूनच विविध तपासणींसाठी रुग्णांनी गर्दी केली होती. अशातच सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक रुग्णालयातील बत्ती गूल झाली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर दिसून आला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाला; परंतु सकाळी १० वाजतापासून वीज नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती. विशेषत: एक्स-रे, सोनोग्राफी यासारख्या तांत्रिक तपासणीदेखील प्रभावित झाल्या असून, इतरही वॉर्डातील रुग्णसेवा प्रभावित झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, काही क्षणांसाठी अतिदक्षता विभागही प्रभावित झाला होता. हीच स्थिती जळीत कक्ष आणि बाल रुग्ण विभागातही दिसून आली. विद्युत पुरवठा नसल्याने सोमवारी एक्स-रे, सोनोग्राफी वॉर्ड पूर्णत: ठप्प पडले होते. त्यामुळे रुग्णांना तांत्रिक तपासणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले होते.जीएमसीत एकच तंत्रज्ञशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्युत यंत्रणा हाताळण्यासाठी एकच तंत्रज्ञ कार्यरत आहे. या एकाच तंत्रज्ञावर संपूर्ण महाविद्यालय व रुग्णालयातील विद्युत यंत्रणेची जबाबदारी आहे. रिक्त पदामुळे या एकाच तंत्रज्ञानाला दिवसा आणि रात्रीची जबाबदारी सांभाळावी लागते.महावितरणमार्फतच हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रुग्णालयातील विद्युत यंत्रणेमध्ये कुठलाच बिघाड झालेला नाही. दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याने रखडलेली कामे पूर्ववत सुरू करण्यात आली.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय