शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपमध्ये काथ्याकूट

By admin | Updated: March 21, 2017 02:47 IST

अनुभवी नगरसेवकांना मिळणार प्राधान्य?

अकोला, दि. २0- महापालिकेची एकहाती सत्ता मिळविणार्‍या भारतीय जनता पार्टीने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीनंतर आता स्थायी समितीच्या गठनाकडे लक्ष कें द्रित केले आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन करून सभापतिपदासाठी सक्षम व्यक्तीची निवड करण्यासाठी पक्षात काथ्याकूट सुरू असल्याची माहिती आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी पहिल्यांदाच भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. २0 प्रभागांतील ८0 जागांपैकी तब्बल ४८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. साहजिकच, मनपात सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला. शहरात सुरू असलेल्या विकास कामांच्या बळावर भाजपने सत्ता स्थापन केली असली तरी भविष्यातही दज्रेदार विकास कामे कायम ठेवण्याची जबाबदारी पक्षावर आली आहे. निश्‍चितच महापालिकेतील पदाधिकारी-कंत्राटदार व अधिकार्‍यांची अभद्र युती पुन्हा होणार नाही, याचे भान पक्षाने ठेवणे अपेक्षित आहे. शहराचा व महापालिकेचा अभ्यास असणार्‍या विजय अग्रवाल यांची महापौरपदी तर वैशाली विलास शेळके यांची उपमहापौरपदी नियुक्ती केल्यानंतर आता पक्षाने स्थायी समितीच्या १६ सदस्यीय समितीच्या गठनाकडे लक्ष कें द्रित केले आहे. येत्या आठवड्यात स्थायी समितीच्या गठनाची प्रक्रिया पार पडण्याची चिन्हे आहेत. त्या पृष्ठभूमीवर स्थायी समितीच्या सभापतिपदाची सूत्रे योग्य, सक्षम व पक्षाप्रती प्रामाणिक राहणार्‍या व्यक्तींच्या हातामध्ये सोपविल्या जाणार असे मानल्या जात आहे. त्यातही अनुभवी नगरसेवकांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मतांचे राजकारण भोवणार!महापालिकेच्या निवडणुकीत प्रभागांमध्ये पॅनेलद्वारे निवडणूक लढणार्‍या पक्षाच्या उमेदवारांनी पॅनेलमधील इतर उमेदवारांना सहकार्य न केल्याची बाब काही ठरावीक प्रभागांत घडली होती. सहकारी उमेदवारापेक्षा दुसर्‍या पक्षाकडून निवडणूक लढणार्‍या मात्र एकाच समाजाशी जुळलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पारड्यात मते टाकण्यात आली. हा प्रकार मतमोजणीच्या दिवशीच उघडकीस आला होता. असे असतानाही महापौरपदी वर्णी लावण्यासाठी काही नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तगादा लावला होता. महापौरपदाच्या निवडणुकीत भोवलेले मतांचे राजकारण सभापतिपदाच्यादेखील आड येणार, हे निश्‍चित मानल्या जात आहे.