शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन खरेदीमुळे पोस्टाच्या नफ्यात वाढ

By admin | Updated: December 5, 2014 00:11 IST

ऑनलाईन खरेदी-विक्री करणा-या ग्राहकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ.

राम देशपांडे/अकोला ऑनलाईन खरेदी-विक्री करणार्‍या ग्राहकांच्या संख्येत अलिकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन मार्केटिंगमुळे संबंधित कंपन्यांसोबतच टपाल खात्यालाही फायदा होत असून, पोस्टाच्या ग्राहक संख्येत वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे.ऑनलाईन विक्रीच्या व्यवसायात नामांकित कंपन्या उतरल्या असून, विश्‍वसनियता, गुणवत्ता आणि वाजवी किंमतीमुळे ऑनलाईन खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. डिसेंबर २0१३ पासून कंपन्यांनी ह्यकॅश ऑन डिलिव्हरीह्ण चा (घरपोच वस्तु मिळाल्यानंतर किंमत अदा करणे) पर्याय खुला केल्याने ग्राहकांची संख्या आणखी वाढली. ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचविण्यासाठी ऑनलाईन रिटेल कपन्यांकडून खासगी कुरिअर कंपन्यांसोबतच टपाल खात्याचाही वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे पोस्टाच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती वरिष्ठ डाक अधिकार्‍यांनी दिली. ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे डाक विभागाला नेमका किती फायदा झाला, याची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसली, तरी अलिकडच्या काळात खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पोस्टाने पाठविण्यात येणार्‍या पार्सल्सची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास येत असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. खासगी कंपन्यांच्या कुरिअर सर्व्हिसमुळे पोस्टामार्फत पाठविल्या जाणार्‍या पार्सल्सची संख्या मध्यंतरी रोडावली होती; मात्र ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवसायामुळे पोस्टाला पुन्हा ह्यअच्छे दिनह्ण येऊ लागले आहेत. खासगी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातूनही कंपन्या आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पाठवितात; मात्र, देशात जवळपास दीड लाख पोस्ट ऑफिसेसचे जाळे, अगदी गाव पातळीवर असलेली यंत्रणा आणि विश्‍वासार्हता लक्षात घेता, पोस्टाला प्राधान्य दिले जात वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या फॅडमुळे अधिकाधिक ग्राहक टपाल खात्याशी जोडले जात आहेत. हिच परिस्थिती राहीली तर, भविष्यात पोस्टाचा कायापालट होईल आणि वाढत्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफीसेसमध्ये ह्यकिऑक्सह्ण (काऊंटर) उभारावे लागतील, असा विश्‍वास डाक अधिकार्‍यांनी व्यक्त केला.