शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोजणीअभावी रखडला जागेचा ताबा!

By admin | Updated: May 17, 2017 01:59 IST

भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी होणार केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील निमवाडीस्थित खुल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी पाच महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या जागेची मोजणी अद्याप करण्यात आली नसल्याने, जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक कार्यालयामार्फत जागेची मोजणी केव्हा केली जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अकोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यासाठी सन २००६-०७ मध्ये शासनामार्फत मंजुरी देण्यात आली; परंतु जागा उपलब्ध झाली नसल्याने सामाजिक न्याय भवन बांधकामाचे घोंगडे भिजतच राहिले. अकोल्यातील निमवाडीस्थित पोलीस विभागाच्या ताब्यातील जागेपैकी ८ हजार ९३७ चौरस मीटर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यास सन २०१४ मध्ये शासनामार्फत मान्यता देण्यात आली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेली निमवाडीतील जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावे करण्याची अधिसूचना शासनाच्या नगर विकास विभागामार्फत गत डिसेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी ८ हजार ९३७ चौरस मीटर जागा देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गत १७ जानेवारी रोजी दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सामाजिक न्याय भवनासाठी जागा देण्याकरिता जागेची मोजणी करून जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला देण्याचे निर्देश अकोला तहसीलदारांनी पत्राद्वारे भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक कार्यालयाला दिले; परंतु पाच महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक कार्यालयामार्फत जागा मोजणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. जागेच्या मोजणीअभावी सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामासाठी जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची मोजणी केव्हा केली जाणार आणि सामाजिक न्याय भवनाच्या इमारत बांधकामासाठी जागेचा ताबा केव्हा दिला जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक सारीका कडू यांच्याशी मंगळवारी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. जागेची मोजणीही रखडली!सामाजिक न्याय भवन उभारणीसाठी मंजूर करण्यात आलेल्या जागेची मोजणी करून, जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला द्यायचा आहे; परंतु भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयामार्फत जागेची मोजणी अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे जागा ताब्यात देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने भूमी अभिलेख आणि महसूल प्रशासनामार्फत जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाला देण्याची प्रक्रिया केव्हा पूर्ण करण्यात येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.--