शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीचा गुंता कायम; १५ हजार शेतकरी प्रतीक्षेत!

By admin | Updated: July 13, 2017 01:10 IST

जिल्ह्यात ३ लाख ५२ हजार क्विंटल तुरीची खरेदी केव्हा सुरू होणार?

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीदराने ‘नाफेड’द्वारे महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर बंद करण्यात आलेली तूर खरेदी अद्यापही सुरू करण्यात आली नाही. तूर खरेदीचा गुंता कायम असल्याने, नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या ३ लाख ५२ हजार २३७ क्विंटल तुरीची खरेदी केव्हा सुरू करण्यात येणार, याबाबत जिल्ह्यातील १४ हजार ५२४ तूर उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवरील हमीदराने तूर खरेदी गत १० जूनपासून बंद करण्यात आली. खरेदी केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी केलेल्या आणि टोकन दिलेल्या जिल्ह्यातील १४ हजार ५२४ शेतकऱ्यांची ३ लाख ५२ हजार २३७ क्विंटल तूर अद्याप खरेदी करण्यात आली नाही. महिना उलटून गेला; मात्र तूर खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने, खरेदीअभावी तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. दरम्यान, शेतकरी जागर मंचच्यावतीने गत आठवड्यात छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची तूर दोन दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून आ. बच्चू कडू यांना देण्यात आले होते. आठवडा उलटून गेला; मात्र तूर खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यानुषंगाने तूर खरेदीचा गुंता कायम असल्याने, तूर खरेदी सुरू होणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील १४ हजार ५२४ तूर उत्पादक शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला आहे.१२५ तुरीचे ट्रॅक्टर उभे!तूर बंद असल्याने, पावसाच्या वातावरणात अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या काही शेतकऱ्यांनी तूर घरी नेली असून, काही शेतकऱ्यांची तूर मात्र अद्याप खरेदी केंद्रावरच आहे. त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीचे १२५ ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असून, टॅ्रक्टरमधील तूर शेतकऱ्यांनी ताडपत्रीने झाकली आहे.नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या १४ हजार ५२४ शेतकऱ्यांची ३ लाख ५२ हजार क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर तूर खरेदी सुरू करण्यात येणार आहे.- बजरंग ढाकरे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी.