शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपातील अनुकंपा उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:21 IST

अनुकंपा उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला असता, महापालिका प्रशासनाने शासन निर्णयाला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.

अकोला: जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पात्र ठरलेल्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याचा आदेश ग्राम विकास विभागाने मे महिन्यात जारी केला. त्याधर्तीवर नगर विकास विभागाने महापालिकेतील अनुकंपा उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला असता, महापालिका प्रशासनाने शासन निर्णयाला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. या मुद्यावर मनपा प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास बहुतांश कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा कालबाह्य ठरणार असल्याचे चित्र आहे.महापालिकेत कार्यरत कर्मचाºयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मागील २० वर्षांपासून पात्र ठरलेल्या उमेदवारांना अद्यापही मनपाच्या सेवेत सामावून घेण्यात आले नसल्याची परिस्थिती आहे. महापालिकेत अनुकंपा धारक उमेदवारांची संख्या ७४ पर्यंत असून त्यांना मनपात सेवेत सामावून न घेतल्यामुळे काही उमेदवारांनी वयाची मर्यादा पार केली आहे. उर्वरित उमेदवारांना हीच धास्ती असल्यामुळे नगर विकास विभागाने जारी केलेल्या आदेशावर मनपा प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेच्या आस्थापना खर्चात वाढ झाल्याची सबब पुढे करीत नवीन कर्मचाºयांची पद भरती करता येणार नाही,असे मत व्यक्त करणाºया प्रशासनाने आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. याबदल्यात संबंधित कंपनीला महिन्याकाठी लाखो रूपयांचे देयक अदा केले जात असून कंत्राटी कर्मचाºयांमध्ये बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त आहेत, हे येथे उल्लेखनिय.कक्ष अधिकाºयांच्या पत्रावर चूप्पी!अनुकंपा धारकांच्या नियुक्त्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे पत्र नगर विकास विभागातील कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांनी मनपा प्रशासनाला दिले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपाने कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये भाजपाप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.आ.गोवर्धन शर्मांनी केला होता पाठपुरावा!मनपातील अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याचा मुद्दा आमदार गोवर्धन शर्मा यांनी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे लावून धरला होता. यासंदर्भात नगरसेवक सतिष ढगे यांनी प्रशासनाला वारंवार निवदन तसेच पत्र दिले आहेत. महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही अनुकंपा उमेदवारांचा तिढा निकाली निघत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका