शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST

तेल्हारा : तालुक्याशी जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तालुक्यात अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाचे ...

तेल्हारा :

तालुक्याशी जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तालुक्यात अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याला जोणाऱ्या चारही रस्त्यांचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा दि. २६ जूनपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा, सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

रस्त्याचे काम सुरू न झाल्यास नांदोकार सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा-आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड, तेल्हारा-वणी वारुळा, तेल्हारा-वरवट या चारही बाजूंच्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांचे कामे संबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडून या रस्त्यावर मातीमिश्रीत टाकल्यामुळे पावसाच्या दिवसात वाहन घसरुन अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे तालुक्यातील नागरिकांसह रुग्णांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.

रस्त्याच्या कामासाठी हजारो वृक्षांची कत्तल

तालुक्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. झाडे तोडल्यानंतर नव्याने झाडे लावण्याचे कोणतेही प्रयोजन संबंधित ठेकेदाराने केले नसल्याचा आरोप विशाल नांदोकार यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे. यापूर्वीही रस्त्यांचे कामे त्वरित करण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र कामाला गती न मिळाल्याने विशाल नांदोकार २६ जूनपासून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर सकाळी १० वाजतापासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची माहिती निवेदनात आहे. याबाबत तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना कळविले असून, निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सा. बांधकाम यांना दिल्या आहेत.