शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण मंडळाला ४६ वीटभट्टय़ांचीच माहिती

By admin | Updated: March 6, 2017 02:07 IST

शेकडो अवैध वीटभट्टय़ा कार्यरत; महसूल विभागाकडून पुरविली त्रोटक माहिती

अकोला, दि. ५- जिल्हय़ातील अनेक महामार्गांंंलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे. महसूल विभागाने दिलेली ही माहिती अत्यंत त्रोटक असून, त्याआधारे आता प्रदूषण नियंत्रण मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणार आहे हे विशेष!पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळीच अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्‍या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून माहिती मागविण्यात आली. ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर आता कागदोपत्री जिल्हय़ात केवळ ४६ वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी सहामध्ये वीज केंद्रातील राखेपासून विटांची निर्मिती केली जाते. कायद्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्‍चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ांना मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे निर्मिती करता येईल.महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, अकोला शहर, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. वीटभट्टय़ांसाठी बंधनकारक नियम*मानवी वसाहतीलगतच्या पर्यावरणातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विटांचा आकार व एकावेळी निर्मितीच्या संख्येनुसार वीटभट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती असल्याशिवाय वीटभट्टी सुरू करता येत नाही, असा नियम आहे. *त्यामध्ये ९ : ४ : ६ इंच आकाराच्या २५ हजार आणि ९ : ४ : ३ इंच आकाराच्या ५0 हजारांपेक्षा जास्त नगांची निर्मिती करणार्‍यांना राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके आणि कायद्यातील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येने विटांची निर्मिती करणार्‍यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीची गरज नसली, तरी कायद्यातील अटी व शर्ती बंधनकारक आहेत.