शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
4
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
5
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
6
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
7
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
8
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
9
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
10
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
11
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
12
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
13
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
14
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
15
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
16
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
17
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
18
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
19
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
20
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणकारी मलबा प्रक्रियेविनाच जातो जमिनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:25 IST

२७ पैकी १६ महापालिकांनी याप्रकरणी कारवाई करणारी यंत्रणाच उभारली नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला.

- सदानंद सिरसाटअकोला : नवीन इमारतींचे बांधकाम तसेच जीर्ण इमारती पाडताना त्या मलब्यातून वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची जबाबदारी असताना राज्यातील २७ पैकी १६ महापालिकांनी याप्रकरणी कारवाई करणारी यंत्रणाच उभारली नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला. तसेच महापालिकांना नोटीस देत जबाबदारी निश्चित करण्याचेही सातत्याने बजावले आहे.विशेष म्हणजे, नवीन बांधकाम करताना प्रदूषण होऊ नये तसेच जीर्ण इमारतीच्या मलबा थेट जमिनीत न गाडता त्यावर प्रक्रिया केल्यानंतरच विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डिमोलिशन वेस्ट मॅनेजमेंट रुल्स-२०१६’ लागू केला आहे. या अधिनियमानुसार अंमलबजावणीचा वार्षिक अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला. तसेच अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील एकूण ३८४ संख्येत असलेल्या महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींना सातत्याने नोटीसही दिल्या आहेत. तरीही राज्यातील २७ पैकी १६ महापालिकांनी कायदेशीर प्रक्रिया राबविण्यासाठी यंत्रणाच उभारली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकांनी ही यंत्रणा उभारल्यास प्रदूषण निर्माण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाते. तसेच हवा आणि जमिनीचे प्रदूषण होण्याला पायबंद घालता येतो; मात्र त्याबाबत महापालिका कमालीच्या उदासीन असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. 

- प्रदूषण रोखण्यास उदासीन महापालिकाबांधकाम व मलब्याने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी म्युनिसिपल मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करण्याला १६ महापालिकांनी ‘खो’ दिला आहे. त्यामध्ये बृहन्मुंबई, पिंप्री चिंचवड, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, पनवेल, कोल्हापूर, नांदेड वाघाळा, धुळे, चंद्रपूर, अकोला, अमरावती, लातूर, वसई-विरार व अहमदनगर या महापालिकांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण