शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत तापू लागले राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:49 IST

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर गावपातळीवर पुढार्‍यांकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण तापू लागले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर गावपातळीवर पुढार्‍यांकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण तापू लागले आहे.पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने निवडणुका होत असलेल्या गावांमध्ये इच्छुक उमेदवारांसह गाव पातळीवरील पुढार्‍यांकडून निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानुषंगाने ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पॅनल गठित करणे, पॅनलचे जास्तीत -जास्तीत उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या कामात गाव पातळीवरील पुढारी गुंतले आहेत. त्यामध्ये पॅनलची उमेदवारी मिळवून वॉर्डात विजय कसा मिळविता येईल, या दृष्टीने इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्यास केवळ सहा दिवसांचा कालावधी उरला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण गावागावांत तापू लागले आहे. या निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची मोर्चेबांधणी संबंधित पॅनल-गटांच्या पुढार्‍यांकडून केली जात आहे.

सरपंचांची थेट जनतेतून निवड; इच्छुकांचे बाशिंग गुडघ्याला!ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी  थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने सरपंच पदांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गावागावांतील अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्याने, गावातील मतदारांसमोर जाऊन, ही निवडणूक लढविण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी सुरू केली आहे.