शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीसाठी राजकीय पक्ष सरसावले

By admin | Updated: April 14, 2017 01:55 IST

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीच्या गठनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सदस्य निवडीसाठी १५ एप्रिल रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या विशेष सभा; ‘स्थायी’साठी १६ सदस्यांची होणार निवड

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीच्या गठनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सदस्य निवडीसाठी १५ एप्रिल रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पृष्ठभूमीवर राजकीय पक्ष सरसावले असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ‘स्थायी’मध्ये नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.समितीमध्ये वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व इतर अपक्ष नगरसेवकांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मनपाच्या निवडणुकीत भाजपचे ४८ नगरसेवक विजयी झाले असून, अपक्ष नगरसेविका माधुरी मेश्राम यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे तूर्तास चित्र आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ ४९ झाल्याने स्थायी समितीमध्ये भाजपच्या दहा सदस्यांचा समावेश होऊ शकतो. विरोधी पक्ष काँग्रेसचे संख्याबळ १३ असून, संख्याबळानुसार काँग्रेसच्या दोन सदस्यांचा मार्ग खुला आहे. उर्वरित ४ जागांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व भारिप-बमसंमध्ये रस्सीखेच रंगली आहे. शिवसेनेचे संख्याबळ आठ असून, प्रभाग ११ मधील अपक्ष नगरसेवक जकाऊल हक (डब्बू सेठ) यांची मदत घेऊन आघाडी स्थापन केल्याने सेनेचे संख्याबळ नऊ झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाच असून, त्यांनी भारिप-बमसंचे तीन तर एमआयएमचे मोहम्मद मुस्तफा यांना सोबत घेत एकूण नऊ सदस्यांची आघाडी गठित केली. दोन्ही आघाड्यांचे संख्याबळ प्रत्येकी नऊ झाल्याने दोन्ही आघाडीतून प्रत्येकी दोन सदस्यांची स्थायी समितीसाठी वर्णी लागेल. इच्छुक नगरसेवकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे फिल्डिंग लावणे सुरू केले असून, स्थायीसाठी कोणाची निवड होते, हे विशेष सभेत दिसून येईल. आज शिवसेनेची बैठकशिवसेनेने अपक्ष नगरसेवक जकाऊल हक यांना सोबत घेतल्यामुळे त्यांच्या आघाडीचे एकूण संख्याबळ नऊ झाले आहे. संख्याबळानुसार सेनेकडून ‘स्थायी’साठी दोन सदस्यांची नावे दिल्या जातील. यासंदर्भात शुक्रवारी आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, गटनेता राजेश मिश्रा यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.भाजपच्या बैठकीत चर्चा‘स्थायी’च्या मुद्यावर गुरुवारी पक्ष कार्यालयात भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. बैठकीला भाजपचे स्थानिक नेते, महापौर उपस्थित होते. स्थायी समितीसह आगामी सभांमध्ये विकास कामांचे प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यावर चर्चा करण्यात आली.