दोन दिवस कोविड लसीकरण बंद
मागील १६ दिवसांपासून जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, ३१ जानेवारीपासून दोन दिवस जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविड लसीकरण मोहीम दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस देणे सोयीस्कर व्हावे, या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. याशिवाय आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ डोस पाजणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाने जबाबदारीने आपल्या पाल्यांना पोलिओ डोस द्यावा. पोलिओ लसीकरणादरम्यान जिल्ह्यात कोविड लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ