शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची दिवाळी होणार गोड!

By admin | Updated: October 28, 2016 02:51 IST

पोलीस अधीक्षकांचा पुढाकार घेऊन कर्मचा-यांसाठी नागपूरहून आणली मिठाई.

नितीन गव्हाळे अकोला, दि. २७-पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांना दसरा, दिवाळी, ईदसारखे आनंदोत्सव कुटुंब, मुलांसोबत साजरेच करता येत नाहीत. दिवाळी साजरी करायला मिळो अथवा न मिळो; परंतु यंदाच्या दिवाळी उत्सवामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचे तोंड मात्र गोड होणार आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांना स्पेशल दिवाळी भेट देण्यासाठी नागपूरहून नामांकित कंपनीची मिठाई बोलाविली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात येत आहे. पोलीस दलामध्ये मिठाई वाटपाचा उपक्रम प्रथमच राबविला जात असल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. सातत्याने बंदोबस्त, गुन्हय़ांचा तपास, राजकीय नेत्यांचे दौरे यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व्यस्त असतात. राबराब राबूनही त्यांचे कोणी कौतुक करीत नाही किंवा शुभेच्छा देत नाहीत. कुणाकडून कशाचीही अपेक्षा न करता, पोलीस सातत्याने शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी झटत असतात. बर्‍याचदा पोलिसांच्या बोलण्यातून नाराजीसुद्धा व्यक्त होते. तुम्हा सर्वांना दसरा, दिवाळी, ईदसारखे सण साजरे करायला मिळतात; परंतु आमच्या नशिबी ते सुद्धा नाही. दिवाळी, दसर्‍याच्या दिवशीही बंदोबस्तावर तैनात राहावे लागते. पोलीस ठाण्यात कार्यरत राहावे लागते. इच्छा असूनही कुटुंबीय, मुलांसमवेत दिवाळी उत्सव साजरा करता येत नाही, याची जाणीव खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनासुद्धा आहे. आपल्या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना दिवाळी साजरी करता येत नसली, तरी यंदाच्या दिवाळीत त्यांचे तोंड गोड करावे आणि त्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्वत:हून पुढाकार घेत, नागपूर येथील एका नामांकित कंपनीकडून शुद्ध तुपातल्या मिठाईचे बॉक्स बोलाविले आहेत. पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांना या मिठाई बॉक्सचे पोलीस मुख्यालयातून वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमाची पोलीस दलात चांगलीच चर्चा आहे.२७00 पोलिसांना मिठाईचे वितरणपोलीस दलामध्ये जिल्हा व शहरात २७00 संख्याबळ आहे. यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांंना दिवाळी उत्सवादरम्यान मिठाईचे वितरण करण्यात येत आहे. पोलीस मुख्यालयामध्ये जाऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी आपली मिठाईची भेट घेऊन जात आहेत. पोलिसांचा दिवाळी मेळावा घेण्याची प्रथा होती; परंतु त्यात खंड पडला. आमचे अधिकारी, कर्मचारी वर्षभर परिश्रम करतात. त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात. या दृष्टिकोनातून यंदाच्या दिवाळीत त्यांना मिठाई भेट देण्यात येत आहे. -चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक.