शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचारी निलंबित; ठाणेदाराचीही चौकशी

By admin | Updated: September 24, 2015 01:41 IST

महिलेस १५ हजारांची लाच मागितल्याचे प्रकरण भोवले.

अकोला - विनयभंगाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासाठी सुमारे १५ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी संजय लांडे याला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बुधवारी तडकाफडकी निलंबित केले. लाचेची रक्कम ठाणेदारांना द्यावी लागणार असल्याचे लांडे याच्या बयाणातून समोर आल्यानंतर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ठाणेदार प्रकाश निघोंट यांचीही बुधवारी तब्बल ३ तास चौकशी केली. बाश्रीटाकळी येथील रहिवासी असलेल्या एका महिलेची छेडखानी झाल्यानंतर महिलेने या प्रकरणाची तक्रार बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात केली. सदर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी संजय लांडे याने त्यांना सुमारे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामधील ५ हजार रुपयांची लाच लांडे याने डाबकी रोडवरून स्वीकारून उर्वरित १0 हजार रुपयांची लाच ६ सप्टेंबर रोजी ठाण्यात आणण्याचे सांगितले होते. महिलेने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने संजय लांडे या पोलीस कर्मचार्‍यास अटक केली. उर्वरित लाचेची रक्कम ठाणेदारांना द्यावी लागणार असल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये समोर आल्यानंतर अकोला एसीबीने ठाणेदार प्रकार निघोंट यांची बुधवारी सायंकाळी तीन तास चौकशी केली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी लाचखोर पोलीस कर्मचारी संजय लांडे याला तडकाफडकी निलंबित केले. प्रकाश निघोंट यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी केली असून, त्यांना या प्रकरणामध्ये दोषी ठरविण्यात येणार आहे किंवा नाही, हे लवकरच समोर येणार आहे.