शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दामिनी पथकातील पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटले!

By admin | Updated: June 2, 2017 01:55 IST

दोन्ही पोलीस निलंबित: छेडखानी रोखण्यासाठी सुरू केलेल्या पथकाचा गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील छेडखानीच्या घटनांना आळा बसावा या शुद्ध हेतूने पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेले दामिनी पथक प्रेमी युगुलांना पकडून, त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना लुटत असल्याची घटना उघडकीस आली. दामिनी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अन्नपूर्णा मंदिराजवळ रविवारी एका प्रेमी युगुलाला पकडून, त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी सहा हजार रुपये घेतले; परंतु प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात आल्यावर या कर्मचाऱ्यांनी पैसे परत केले. हा प्रकार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या कानावर गेल्यावर, त्यांनी तडकाफडकी पोलीस कर्मचारी सागर सिरसाट आणि शैलेश पाचपोर यांना निलंबित केले. पोलीस अधीक्षक गुन्हेगारांवर, छेडखानी करणाऱ्या टारगट युवकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दामिनी पथकासोबतच इतर तपास पथके स्थापन करतात. या पथकांनी चांगले काम करून गुन्हेगारांना वठणीवर आणले पाहिजे; परंतु हीच पथके गुन्हेगारांना सोडून सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या घटना अनेकदा घडतात. असा काहीसा प्रकार रविवारी अन्नपूर्णा माता मंदिराजवळ घडला. संग्रामपूर येथील एक युवक आणि शिक्षणासाठी अकोल्यात असलेल्या तेथीलच एका युवतीला भेटण्यासाठी रविवारी अकोल्यात आला. दोघे अन्नपूर्णा मंदिराजवळ भेटले. ते बोलत असताना, दामिनी पथकातील दोघे पोलीस कर्मचारी तेथे आले. त्यांनी युवक व युवतीला हटकले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे हिसकले आणि बदनामी करण्याची धमकी दिली; परंतु घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळाली. त्यामुळे हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी सहा हजार परत केले आणि घटनेची कुठे वाच्यता न करण्यास बजावले; परंतु याप्रकरणी पोलिसांनी युवक, युवतीचे जबाब नोंदविले आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविला आला. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी प्रेमी युगुलाला लुटल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत, गुरुवारी उशिरा रात्री सागर सिरसाट, शैलेश पाचपोर या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.