शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!

By admin | Updated: April 21, 2017 01:54 IST

विलास पाटील, सपकाळ अकोल्यात: शंकर शेळके अकोला एसीबीचे प्रमुख

अकोला : पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार, जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध आढाव, ज्ञानेश्वर जाधव यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. बुलडाणा एसीबीचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, नागपुर ग्रामीणमधुन शैलेष सपकाळ यांचीही यांची अकोल्यात बदली झाली आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शंकर शेळके यांची अकोला एसीबीला बदली करण्यात आली आहे. पोलीस विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांच्या आदेशानुसार राज्यभरातील पोलीस निरीक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांची यादीच गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अकोल्यातीलही पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांची अमरावती शहरात बदली झाली आहे. रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली. पातूरला ठाणेदार राहिलेले अनिरुद्ध आढाव यांची वर्धा येथे, ज्ञानेश्वर जाधव यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे बदली करण्यात आली. जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे बदली झाली. पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथील दत्तात्रय आव्हाळे यांची अकोला शहरात, सुनील हुड यांची बुलडाणा येथे दिगंबर भदाणे यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे, तर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची अकोला एसीबीला बदली झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक यू. एम. चंदेल यांची हिंगोली येथे, तर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांची अकोला शहरात बदली झाली. सहा नवीन पोलीस निरीक्षक येणार! शहरात सहा नवीन पोलीस निरीक्षक येणार असून, यात राज्य गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, अमरावती येथील गणेश अणे, बुलडाणा येथील अशोक कंकाळे, रागुविमधून सुनील सोळके यांच्यासह बुलडाणा एसीबीतून विलास पाटील यांची अकोल्यात बदली झाली आहे. या सहा पोलीस निरीक्षकांपैकी विलास पाटील, शैलेश सपकाळ यांना अकोला शहर परिचित आहे. विलास पाटील यापूर्वी कोतवालीसह रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये ठाणेदार म्हणून कार्यरत होते.सपकाळ हे खदान पोलीस ठाण्यात कार्यरत होते.