शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक-‘एएसआय’मध्ये जुंपली

By admin | Updated: June 8, 2017 01:36 IST

परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल; घराच्या बांधकामावरून वाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महसूल कॉलनीतील रहिवासी पोलीस निरीक्षक कुटुंबीय व सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये घराच्या बांधकामावरून मंगळवारी आणि बुधवारी वाद झाला. वाद वाढल्याने दोघांनीही सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारींवरून पोलिसांनी पोलीस निरीक्षक विजय पाटकर व दोघांविरुद्ध अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार, तर सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वानखडे व इतर सहा जणांविरुद्ध विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.महसूल कॉलनीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश गोटीराम वानखडे (६४) व त्यांच्या शेजारीच सध्या वाशिम येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय पाटकर राहतात. विजय पाटकर यांच्या पत्नी वर्षा पाटकर यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रमेश वानखडे, रत्ना वानखडे , शुभांगी वानखडे व इतर चार आरोपींनी पाटकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करीत साहित्याची नासधूस केली. सोबतच त्यांच्या घरातील महिलांचा विनयभंग केला. त्यानंतर पर्समधील ३० हजार रुपये हिसकल्याचे नमूद केले.यावरून पोलिसांनी रमेश वानखडे, रत्ना वानखडे , शुभांगी वानखडे व इतर चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५२, ३५४ अ, ३२३, ५०४, ५०७, ५०६, ३३७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत, तर रमेश वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते बुद्धगया येथे गेले होते. परत आल्यानंतर त्यांचे शेजारी विजय पाटकर यांनी त्यांच्या भिंतीवर बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यांनी हटकले असता दोघांमध्ये बांधकामावरून वाद झाला. त्यानंतर विजय पाटकर यांच्या कुटुंबीयांनी म्हणजेच वर्षा विजय पाटकर, अर्पिता पाटकर यांनी वाद घालून रमेश वानखडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले व रमेश वानखडे यांच्या पत्नीचे २५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरीने तोडून हिसकावले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी विजय पाटकर, वर्षा विजय पाटकर, अर्पिता पाटकर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच भादंवि ३९२, २९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.