शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हगणदरीमुक्तीसाठी पोलिसांची घेणार मदत!

By admin | Updated: August 31, 2016 02:48 IST

उघड्यावर शौचाला जाणार्‍यांवर होणार कारवाई.

संतोष येलकरअकोला, दि. ३0: जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जाणीवपूर्वक उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर कारवाई करण्याकरिता जिल्हा परिषद पोलिसांची मदत घेणार आहे. शौचालय न बाधता आणि शौचालयाचा वापर न करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बुधवारी पोलीस अधीक्षकांना पत्र देणार आहेत.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत असूनही, अनेक गावांमध्ये शौचालय बांधण्यात येत नाही आणि शौचालय बांधल्यानंतर त्याचा वापर करण्यात येत नाही. उघड्यावर- रस्त्यावर शौचास करण्यात येत असल्याने, ग्रामस्थांना त्रास सहन करावा असून आरोग्य धोक्यात येत आहे. ३१ मार्च २0१८ पूर्वी अकोला जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हय़ात सन २0१६-१७ मध्ये कृती आराखड्यानुसार जिल्हय़ातील ३२ हजार ६६५ कुटुंबांच्या घरी शौचालय सुविधा असणे आवश्यक आहे; मात्र शौचालय बांधकामासाठी तोंडी, लेखी सांगूनही शौचालयांचे बांधकाम आणि शौचालयांचा वापर होत नसल्याने, उघड्यावर शौचास करणार्‍यांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ व ११७ अन्वये कारवाई करण्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पोलिसांची मदत घेणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांच्यामार्फत ३१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात येणार आहे. जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर कारवाईबाबत पोलिसांच्या मदतीतून जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास मदत होणार आहे. 'बीडीओं'ना दिले पत्र !उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना पत्र देण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी जिल्हय़ातील सातही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना (बीडीओ) दिल्या आहेत.जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जनजागृती करून, वारंवार विनवणी करूनही शौचालय बांधण्यात येत नाही, शौचालयांचा वापर करण्यात येत नसल्याने, उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या सक्रिय मदतीतून जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास मदत होईल. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात येणार आहे. -अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला