शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

पोलीस मुख्यालयासमोरच सुरू होता जुगार अड्डा!

By admin | Updated: June 3, 2017 01:36 IST

सहा अटकेत: सहा फरार; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस मुख्यालयासमोर मिश्रा नामक व्यक्तीच्या जुगार क्लबवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी छापा मारला. यावेळी सहा जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अनिकट परिसरात गत काही दिवसांपासून मिश्रा नामक इसमाचा जुगार क्लब मोठ्या जोरात सुरू आहे. या जुगार क्लबवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी यापूर्वी एका महिन्याच्या कालावधीत दोन वेळा छापा टाकून जुगारींना अटक केली होती. त्यानंतरही शुक्रवारी हा क्लब सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अळसपुरे यांनी पथकासह जुगार क्लबवर छापा टाकून सहा जुगारींना ताब्यात घेतले. यामध्ये हनुमान आखाडा येथील रहिवासी संजय नारायण रत्नपारखी, खोलेश्वरमधील तुफानीलाल गयादीन यादव, हरिहरपेठ येथील पंकज दीपक उगडे, कैलास टेकडी येथील रहिवासी अशोक श्ंकरराव शाहू, महात्मा फुले नगरातील रहिवासी दिलीप विजय वर्मा आणि सिंधी कॅम्पमधील रहिवासी शेख करीम शेख इस्माईल यांचा समावेश आहे. या जुगारींकडून रोख, तीन मोबाइल, दुचाक्या तीन, एक पंखा आणि पाण्याची कॅन असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार क्लब चालविणाऱ्या मिश्रासह सहा जण फरार झाले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मिश्रा नामक इसमाचा क्लब गत एक महिन्यापासून चर्चेत आला असून, या ठिकाणावर विशेष पथकाने तिसरी कारवाई केली आहे. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांची हप्तेखोरी उघड झाली असल्याची चर्चा अकोला शहराच्या पोलीस वर्तुळात दिवसभर होती.