शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीची हत्या करणार्‍या आरोपींपर्यंंंत पोहोचण्यात  पोलिसांना अपयश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:04 IST

अकोला : नायगाव परिसरातील पाच वर्षीय आलिया परवीन  शेख फिरोज हिच्या निर्घृण हत्येची घटना रविवारी दुपारी  उघडकीस आली होती. तिच्यावर अत्याचार करून आरो पींनी तिची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी दोन  दिवस उलटूनही अकोट फैल पोलीस आरोपींपर्यंंंत  पाहोचण्यात अपयशी ठरत आहेत. मंगळवारी दुपारी पोलीस  अधीक्षक राकेश कलासागर यांनी घटनास्थळाला भेट देऊन  पाहणी केली आणि पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना  केल्या. 

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेटसंशयितांची ओळख परेड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नायगाव परिसरातील पाच वर्षीय आलिया परवीन  शेख फिरोज हिच्या निर्घृण हत्येची घटना रविवारी दुपारी  उघडकीस आली होती. तिच्यावर अत्याचार करून आरो पींनी तिची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी दोन  दिवस उलटूनही अकोट फैल पोलीस आरोपींपर्यंंंत  पाहोचण्यात अपयशी ठरत आहेत. मंगळवारी दुपारी पोलीस  अधीक्षक राकेश कलासागर यांनी घटनास्थळाला भेट देऊन  पाहणी केली आणि पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना  केल्या. नायगाव परिसरात राहणारी आलिया परवीन ही चिमुकली  शुक्रवारी सायंकाळी खेळण्यासाठी बाहेर पडली; परंतु बराच  वेळ झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. रात्री उशिरा तिचा  शोध घेतल्यानंतरही ती मिळून आली नाही. त्यानंतर तिच्या  आई-वडिलांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  केली. पोलिसांनी केवळ डायरीमध्ये आलिया बेपत्ता  झाल्याची नोंद घेतली; परंतु आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा  दाखल केला नाही. रविवारी दुपारी आलियाचा मृतदेह एका  पोत्यामध्ये नग्नावस्थेत व कुजलेला असल्याचे दिसून आले. चिमुकल्या आलियावर अज्ञात आरोपींनी लैंगिक अत्याचार  केल्यानंतर आपल्या कृतीचे बिंग फुटू नये, या उद्देशाने तिची  क्रूरपणे हत्या केली आणि मृतदेह पोत्यामध्ये टाकून फेकून  दिला. पोलिसांनी वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा  दाखल करून तपास सुरू केला असता, तर वेळीच आरो पींच्या मुसक्या आवळता आल्या असत्या, असे आलियाच्या  कुटुंबीयांचे म्हणणे आहे; परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष  करून केवळ नोंद करून सोपस्कार पूर्ण केले. पोलीस  दररोज परिसरातील संशयितांना पोलीस ठाण्यात आणून  त्यांची चौकशी करीत आहेत; परंतु त्यातून काहीच निष्पन्न  होत नाही. आरोपींना शोधण्यासाठी अकोट फैल पोलिसांचा  तपास सुरू आहे. मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे  आदींनी नायगाव येथील घटनास्थळाला भेट दिली आणि  पाहणी केली. यावेळी परिसरातील काही नागरिकांसोबतच  चर्चासुद्धा केली. पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने  अकोट फैल पोलिसांनी आवश्यक सूचनासुद्धा केल्या. 

अजूनपर्यंंंत आरोपी मिळाले नाहीत. तपास योग्य दिशेने सुरू  आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आरोपींना अटक करू. - तिरुपती राणे, ठाणेदार,अकोट फैल पोलीस स्टेशन.