शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारातील आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डाबकी रोडवरील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करणाºया पवन रामटेके आणि विजय सावंग यांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी तसेच जडी-बुटीचा व्यवसाय करणारे एक कुटुंब डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवासी आहे. त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डाबकी रोडवरील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करणाºया पवन रामटेके आणि विजय सावंग यांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी तसेच जडी-बुटीचा व्यवसाय करणारे एक कुटुंब डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवासी आहे. त्यांची एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवार २४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शौचासाठी जात होती. यावेळी रस्त्यात पवन रामटेके आणि विजय सावंग हे दोघे उभे होते. या दोघांनी मुलीला एका मकानात नेऊन दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या दोन नराधमांच्या अघोरी अत्याचारानंतर मुलगी घरी परतली; मात्र आई-वडील मोलमजुरीसाठी कामावर असल्याने ती घरी एकटीच रडत बसली. आई-वडील सायंकाळी घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर आई-वडील व मुलगी डाबकी रोड पोलीस ठाण्यात दाखल होऊन त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून यामधील आरोपी पवन रामटेके आणि विजय सावंग यांना अटक केली. दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मारहाणीतील आरोपीस अटकउमरी परिसरातील रहिवासी इसमास मारहाण करणाºया दोघांना सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक केली.मोठी उमरी येथील रहिवासी शंकर जुगल श्रीवास यांना अमोल ऊर्फ भुरिया वामन वाघमारे आणि अमोल दिलीप कडोदे या दोघांना शेतातील फळ खाण्यास मज्जाव केल्यानंतर त्यांनी श्रीवास यांना मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार आहे.